Skip to content
Skip to content
Sheti Ek Shastra Agriculture Blog

shetieakshastra.com

शेतीविषयक वैज्ञानिक माहिती शेतकऱ्यांसाठी

Menu
  • Sheti Ek Shastra | शेतीविषयक वैज्ञानिक माहिती
  • खत मार्गदर्शन
  • पिकानुसार माहिती
  • कीड नियंत्रण
  • कॉन्टॅक्ट
  • जैविक बुरशीनाशके
  • शेती योजना
  • About
  • Disclaimer
  • Privacy Policy
Menu

शेणखत म्हणजे काय? शेणखताचे फायदे, तयार करण्याची पद्धत आणि प्रति एकर वापर

Posted on March 4, 2026March 7, 2026 by mulekaran460@gmail.com
Farmyard Manure (शेणखत) तयार करताना शेतकरी

शेणखत म्हणजे काय? शेणखताचे फायदे, तयार करण्याची पद्धत आणि प्रति एकर वापर किती करावा हे आपण या लेखात पाहणार आहोत त्यामुळे हा लेख आपण शेवटपर्यंत नक्की वाचा.

🌱 शेणखत म्हणजे काय? फायदे, तयार करण्याची पद्धत आणि प्रति एकर वापर

शेतकरी मित्रांनो, पूर्वी आपल्या पूर्वजांनी अनेक वर्षे शेती केली. त्या काळात आजसारखी रासायनिक खते उपलब्ध नव्हती. तरीही शेतीत चांगले उत्पादन मिळत होते. कारण त्या काळात शेतकरी नैसर्गिक खतांचा वापर करत होते. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे खत म्हणजे शेणखत.

आजही अनेक शेतकरी आपल्या शेतात शेणखताचा वापर करतात. परंतु अनेकांना असा प्रश्न पडतो की शेणखत म्हणजे नक्की काय? फक्त जनावरांचे शेण शेतात नेऊन टाकणे म्हणजे शेणखत वापरणे का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे.

काही शेतकऱ्यांना वाटेल की शेणखत म्हणजे काय हे आम्हाला आधीपासून माहिती आहे. परंतु प्रत्यक्षात शेणखताची योग्य व्याख्या आणि ते तयार करण्याची योग्य पद्धत फार कमी लोकांना माहिती असते.

म्हणूनच या लेखात आपण सविस्तर पाहणार आहोत:

शेणखत म्हणजे काय

शेणखताचे फायदे काय आहेत

शेणखत कसे तयार करावे

प्रति एकर किती शेणखत वापरावे


शेतीमध्ये जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शेणखताचा वापर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. योग्य पद्धतीने तयार केलेले आणि योग्य प्रमाणात वापरलेले शेणखत मातीची रचना सुधारते, मातीतील सूक्ष्मजीव वाढवते आणि पिकांच्या वाढीस मदत करते.

आता सर्वप्रथम पाहूया शेणखत म्हणजे नेमके काय.
शेणखत म्हणजे गाई म्हशी शेळ्या मेंढ्या यांच्या गोठ्यातील शेण मूत्र काडीकचरा आणि इतर अवशेष ज्यावेळेस व्यवस्थित कुजवून जे खत तयार होते त्याला आपण शेणखत असे म्हणतो.
आता आपण बऱ्याचदा हे शेण काडी कचरा एकत्र उकिरड्यावर टाकतो आणि आपल्याला वाटते की शेणखत तयार झाले परंतु ते तसे नसते.
शेणखत तयार करताना शेण, भुसा, कडबा, गवताचे अवशेष आणि माती यांचा थर लावून काही महिन्यांपर्यंत कुजवले जाते. कुजण्याच्या प्रक्रियेमुळे हे सर्व पदार्थ एकत्र मिसळून काळसर, भुसभुशीत आणि सुपीक खत तयार होते.
हे खत जमिनीत टाकल्यावर मातीची रचना सुधारते आणि पिकांच्या वाढीस मदत होते.
माझ्या भागातील अनेक शेतकरी हे शेती करत असताना मोठ्या प्रमाणात शेणखताचा वापर करतात त्यामुळे त्यांचा रासायनिक खतावर होणारा खर्च हा फार कमी होतो जमीन भुसभुशीत राहते आणि सेंद्रिय कर्ब आणि गांडुळांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. आता आपण पाहूया की शेणखतामध्ये नेमके घटक कोणते असतात.

शेणखतातील अन्नद्रव्य
आपण पिकांसाठी अनेकदा रासायनिक अन्नद्रव्य देत असतो परंतु हे दीर्घकाळ टिकणारे नसतात पण शेणखतातील अन्नद्रव्य हे दीर्घकाळ टिकणारे असतात तर शेणखतामध्ये कोणते अन्नद्रव्य असतात ते बघूया
साधारणपणे शेणखतात खालील अन्नद्रव्ये आढळतात:
नायट्रोजन (N) – सुमारे 0.5%
फॉस्फरस (P₂O₅) – सुमारे 0.2%
पोटॅशियम (K₂O) – सुमारे 0.5%
याशिवाय कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर तसेच झिंक, लोह, मॅंगनीज यांसारखी सूक्ष्म अन्नद्रव्ये देखील असतात. ही अन्नद्रव्ये पिकांच्या निरोगी वाढीसाठी अत्यंत आवश्यक असतात.

शेण खताचे फायदे
शेतकरी मित्रांनो शेणखत म्हणजे जमिनीसाठी अमृत आहे शेणखतामुळे जमिनीतील उपयोगात असणारे जीवजंतू झपाट्याने वाढतात त्यामुळे रासायनिक खतावरील खर्च फार कमी होतो.

1) शेणखतामुळे जमिनीची सुपीकता वाढते
शेतकरी मित्रांनो आपण पूर्वी बघितले असेल की जमीन ही फार भुसभुशीत होती बैलाच्या नांगराने सुद्धा जमीन नांगरले जायचे परंतु आज 50 55 एचपी चा ट्रॅक्टर सुद्धा जागेवर उभा राहतो हे का होत आहे कारण आपण शेणखताचा वापर करणे सोडून दिले आहे आणि रासायनिक खताचा अतिवापर केला आहे आपण जर शेणखत वापरले तर जमिनीची सुपीकता निश्चित वाढते.

2) मातीची रचना सुधारते
शेणखतामुळे जमिनीतील गांडूळ तसेच उपयुक्त जीवजंतू यांची वाढ होऊन मातीची रचना सुधारते आणि पिकांना फायदा होतो

3) पाण्याची धारण क्षमता वाढते
शेणखतामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढते कारण जमीन भुसभुशीत असल्याकारणाने माती पाण्याचा साठा करून ठेवते नंतर तो साठा पिकांसाठी उपलब्ध होतो.

4) सूक्ष्मजीवांची वाढ होते
शेणखतात अनेक उपयुक्त सूक्ष्मजीव असतात. हे सूक्ष्मजीव मातीतील अन्नद्रव्ये उपलब्ध करून देतात.
5)रासायनिक खताचा वापर कमी होतो
शेणखतामुळे रासायनिक खताचा वापर हा निम्यापेक्षा कमी होतो एकदा टाकलेले शेणखत हे 3 वर्षापर्यंत काम करते

6)जमिनीचे आरोग्य व्यवस्थित राहते
शेणखतामुळें जमिनीचे आरोग्य व्यवस्थित राहते जमिनीचा ph मेंटेन राहतो पाण्याचे प्रदूषण होत नाही मानवी आरोग्यास पोषक.

शेणखत तयार करण्याची शास्त्रीय पद्धत
गोठ्यातील शेण, कडबा, भुसा आणि पानगळ एकत्र जमा करावी.
हे सर्व पदार्थ एका खड्ड्यात किंवा ढिगाऱ्यात साठवावेत.
त्यावर मातीचा किंवा गवताचा थर द्यावा.
ओलावा टिकवण्यासाठी अधूनमधून पाणी शिंपडावे.
साधारण 3 ते 4 महिन्यांनंतर खत पूर्णपणे कुजते.
तयार झालेले शेणखत काळसर रंगाचे आणि मऊ व भुसभुशीत असते

शेणखत वापरण्याची योग्य वेळ
शेतकरी मित्रांनो आपण शेणखत किती टाकतो त्यापेक्षा आपण त्या कोणत्या वेळेला टाकतो ते फार महत्वाचे आहे अनेक शेतकरी नांगरणी करण्याच्या अगोदर शेणखत टाकतात ते शेणखत माती खाली दाबले जाते परिणामी पाहिजे तेवढा फायदा होत नाही मग शेणखत कधी टाकावे
शेणखत हे पेरणीच्या अगोदर टाकावे
शेणखत हे कच्च टाकू नये कारण शेणखत कच्चे असल्यास त्यामध्ये अधिक तापमान असते त्यामुळे झाडांच्या मुळांना इजा होते तसेच हुमणी या किडीचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो
शेणखत हे डायरेक्ट पाण्याच्या संपर्कात येणार नाही त्यासाठी मातीमध्ये मिक्स करावे जेणेकरून शेणखतातील अन्नद्रव्य हे वाहून जाणार नाही .

सेंद्रिय शेतीमध्ये शेण खताचे महत्त्व
आज अनेक शेतकरी सेंद्रिय शेती करण्याकडे भर देत आहे जेणेकरून चांगले अन्न खायला मिळावे त्यासाठी मोठ्या प्रमाणात शेणखत गांडूळ खत वर्मी कंपोस्ट त्याचा वापर वाढला आहे शेणखत हा सेंद्रिय शेतीचा आत्मा मानला जातो
यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते गांडूळ जिवंत राहतात. यामुळे जमीन सुपीक होऊन उत्पन्न वाढते.

निष्कर्ष
शेतीमध्ये शेणखताचा  वापर केलास जमिनीतील जीवजंतू टिकून राहतात सेंद्रिय कर्ब वाढतो जमिनीचा पीएच समतोल राहतो जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आपण जर शेतीमध्ये रासायनिक खता बरोबर शेणखताचा वापर केल्यास उत्पादन वाढते.
यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्याने शेणखताचा वापर करणे गरजेचे आहे तरच आपली जमीन टिकेल.

शेतकरी मित्रांनो आपल्याला आमचे इतर माहितीपर लेख वाचायचे असल्यास खालील लिंकवर क्लिक करा

टूटा कीडनियंत्रण टोमॅटो पिकातील टुटा किड नियंत्रण | Tuta Absoluta ओळख, लक्षणे व संपूर्ण उपाययोजना क्लिक कराhttps://shetieakshastra.com/wp-admin/post.php?post=264&action=edit

🌱 पिकांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता कशी ओळखायची? संपूर्ण मार्गदर्शक क्लिक कर https://shetieakshastra.com/wp-admin/post.php?post=237&action=edit

मिरची लागवड नियोजन | 45 दिवसांचे संपूर्ण मार्गदर्शन https://shetieakshastra.com/wp-admin/post.php?post=42&action=edit

आम्हाला सोशल मीडियावर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका.   Youtube https://www.youtube.com/@shetieakshastr

फेसबुक.https://www.facebook.com/share/17ivcAN3yz/

इंस्टाग्राम.https://www.instagram.com/sheti_eak_shastra?igsh=MXAwbGd6aWpvcWkzdg==

शेतकरी नेहमी विचारतात ते प्रश्न
1. शेणखत किती दिवसात तयार होते?
साधारणपणे शेणखत 3 ते 4 महिन्यांत पूर्णपणे तयार होते.
2. प्रति एकर किती शेणखत वापरावे?
साधारण 4 ते 5 टन शेणखत प्रति एकर वापरण्याची शिफारस केली जाते.
3. कच्चे शेणखत वापरू शकतो का?
नाही. कच्चे शेणखत थेट वापरू नये. ते पूर्णपणे कुजलेले असावे.

3 thoughts on “शेणखत म्हणजे काय? शेणखताचे फायदे, तयार करण्याची पद्धत आणि प्रति एकर वापर”

  1. दिगंबर जठार अडकिने डोंगरकडा says:
    March 6, 2026 at 7:23 pm

    धन्यवाद साहेब आपण खूप छान प्रकारे तंत्र तांत्रिक दृष्ट्या शेण खताचे महत्त्व त्याची पद्धत व त्याचा वापर याबद्दल खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार

    Reply
    1. mulekaran460@gmail.com says:
      March 10, 2026 at 2:10 am

      धन्यवाद धन्यवाद

      Reply
    2. mulekaran460@gmail.com says:
      March 10, 2026 at 2:10 am

      धन्यवाद

      Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2026 shetieakshastra.com | Powered by Superbs Personal Blog theme