Skip to content
Skip to content
Sheti Ek Shastra Agriculture Blog

shetieakshastra.com

शेतीविषयक वैज्ञानिक माहिती शेतकऱ्यांसाठी

Menu
  • Sheti Ek Shastra | शेतीविषयक वैज्ञानिक माहिती
  • खत मार्गदर्शन
  • पिकानुसार माहिती
  • कीड नियंत्रण
  • कॉन्टॅक्ट
  • जैविक बुरशीनाशके
  • शेती योजना
  • About
  • Disclaimer
  • Privacy Policy
Menu

🌶️ मिरची पिकातील व्हायरस रोग: ओळख, लक्षणे आणि संपूर्ण नियंत्रण मार्गदर्शक

Posted on March 30, 2026March 30, 2026 by mulekaran460@gmail.com

मिरची पिकातील व्हायरस रोग शेतकऱ्यांसाठी अतिशय डोकेदुखी ठरत आहे. अनेक शेतकरी व्हायरसला कंटाळून मिरची लागवड करायची बंद केली आहे. अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की एकदा व्हायरस आला की परत मिरची सुधारत नाही. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण मिरची पिकातील व्हायरस नियंत्रण हे बघणार आहोत. व्हायरस मिरची पिकावर येऊ नये म्हणून काय उपाययोजना केल्या पाहिजेत हे आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.

पहिल्यांदा आपण बघणार आहोत मिरची पिकात कोणकोणते व्हायरस येतात.

लीफ कर्ल व्हायरस
सगळ्यात जास्त मिरची पिकावर आढळणारा व्हायरस म्हणजे लीफ कर्ल व्हायरस हा आहे. हा व्हायरस मिरची पिकात मोठ्या प्रमाणात पसरतो आणि मोठे नुकसान करतो.

Mosaic Virus (मोजॅक रोग)
हा व्हायरस सामान्यपणे आपल्याला सोयाबीन पिकामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. परंतु आता बऱ्याचदा हा व्हायरस आपल्याला मिरची पिकात सुद्धा आढळून येत आहे.

Yellow Vein Virus
सामान्यपणे हा व्हायरस सुद्धा आपल्याला अनेक मिरची प्लॉटमध्ये दिसत आहे. याची लक्षणे म्हणजे पानांच्या शिरा पिवळ्या पडतात. परिणामी उत्पन्न कमी होते.

⚠️ व्हायरस कसा पसरतो?
अनेक शेतकऱ्यांना प्रश्न असतो की नेमका व्हायरस पसरतो कसा? व्हायरस पसरण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पिकातील किडी.

मुख्य वाहक कीटक:
पांढरी माशी (Whitefly)
मावा (Aphids)
थ्रिप्स (Thrips)

👉 हे कीटक एका झाडावरून दुसऱ्यावर व्हायरस पोहोचवतात. वरील किडींमुळे व्हायरस अतिशय झपाट्याने पसरतो.

मिरची पिकावर दिसणारी लक्षणे
अनेक शेतकऱ्यांना माहिती आहे की व्हायरस मिरचीवर आल्यास मिरचीची पाने वेड्यावाकड्या आकाराची दिसतात, त्यालाच आपण चोरडामोडा असे म्हणतो. ही पाने दिसायला विकृत असतात. पाने लहान पण जाड दिसतात. पानांवर पिवळे डाग दिसतात. झाडाची वाढ खुंटते. परिणामी उत्पन्न कमी होते.

गंभीर स्थिती:
झाड बोंड होते (stunted growth)
उत्पादन 70–80% पर्यंत घटते.

व्हायरस रोग धोकादायक का आहे?
व्हायरसवर कुठलेही थेट औषध नाही. परिणामी तो पूर्ण शेतात खूप जलद गतीने पसरतो. यावर उपाय करणे कठीण होते.

👉 त्यामुळे “Prevention is better than cure” हेच महत्त्वाचे.

संपूर्ण व्यवस्थापन (Integrated Disease Management)
मिरची पिकावर व्हायरस येऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.

रोप निवड करत असताना व्हायरसमुक्त रोपांची निवड करावी. तसेच व्हायरसला प्रतिकार करणाऱ्या वाणांची निवड करावी. मिरची प्लॉट हा कधीही तणमुक्त ठेवावा.

स्टिकी ट्रॅपचा वापर करावा. एका एकरासाठी 15 ते 16 पिवळे स्टिकी ट्रॅप वापरावे, तर निळे स्टिकी ट्रॅप 20 ते 25 वापरावेत. स्टिकी ट्रॅप लावताना ते नेहमी झाडापासून 5 ते 6 इंच उंच असावेत. खूप खाली किंवा खूप वर लावू नयेत.

सुरुवातीपासून सेंद्रिय उपाय
मिरची पिकामध्ये व्हायरस येऊ नये म्हणून सुरुवातीपासून काही सेंद्रिय उपाय केले तर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवता येते. यामध्ये नीम ऑइल किंवा काही जैविक घटकांचा वापर केल्यास अधिक फायदा होतो. उदाहरणार्थ मेटारायझियम सारख्या बुरशींचा वापर करू शकता. याची 7 दिवसांनी पुनरावृत्ती केल्यास खूप फायदा होतो.

शेतकरी मित्रांनो, नेहमी एक काळजी घ्यावी — सुरुवातीच्या काळापासून फार हार्ड औषधांचा वापर टाळावा. यामुळे कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि नंतर कुठल्याही औषधाचा परिणाम मिळत नाही. त्यामुळे एक फवारणी जैविक आणि एक फवारणी केमिकल असे शेड्युल पाळल्यास व्हायरस नियंत्रण मिळवता येते.

वायरस पसरण्याची कारणे
व्हायरस पसरण्याचे मूळ कारण म्हणजे वाहक कीटक. त्यामुळे या कीटकांवर नियंत्रण मिळवणे म्हणजे व्हायरसवर नियंत्रण मिळवणे होय.

जैविक उपाय:
बायो 303, दमन प्लस, चमक, ट्रिपल अटॅक अशी औषधे वापरू शकता. तसेच घरगुती दशपर्णी अर्क, ब्रह्मास्त्र यांचा वापर केल्यास चांगला परिणाम मिळतो आणि खर्च कमी होतो.

रासायनिक उपाय:
Imidacloprid 17.8 SL
Thiamethoxam 25 WG
Acetamiprid 20 SP

👉 डोस:
0.3 ml प्रति लिटर (औषधानुसार बदलतो)

मार्केटमध्ये अजूनही विविध औषधे उपलब्ध आहेत. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन औषधांचा वापर करावा.

संक्रमित झाडे काढून टाका
व्हायरस नियंत्रणासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या झाडावर संक्रमण झाले आहे ती झाडे काढून नष्ट करावीत, जेणेकरून संपूर्ण क्षेत्रावर परिणाम होणार नाही.

व्हायरससाठी फवारणी कधी करावी?
मिरची पिकावर फवारणी करताना ती नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी करावी. पानांच्या खालच्या आणि वरच्या बाजूस औषध पोहोचेल याची काळजी घ्यावी. अशाप्रकारे फवारणी केल्यास उत्तम परिणाम मिळतो.

वायरस येण्यास शेतकऱ्यांच्या काही चुका कारणीभूत असतात
अनेक शेतकरी पांढरी माशी आणि थ्रिप्स यावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरतात. त्यामुळे व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरतो आणि नियंत्रण मिळत नाही.

🧠 महत्त्वाचे टिप्स
आठवड्यातून 2 वेळा निरीक्षण करा.
सुरुवातीला नियंत्रण केल्यास नुकसान कमी होते.
मिश्र पद्धती (IPM) वापरा.

🏁 निष्कर्ष
मिरची पिकातील व्हायरस रोग हा अत्यंत धोकादायक आहे. पण योग्य वेळी प्रतिबंध आणि कीटक नियंत्रण केल्यास त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते. लक्षात ठेवा — व्हायरसवर औषध नाही, पण व्यवस्थापन आहे.


—

❓ मिरचीवरील व्हायरस संदर्भातील शेतकऱ्यांचे सामान्य प्रश्न (FAQ)

1. मिरचीवर व्हायरस का येतो?
👉 मुख्यतः पांढरी माशी (Whitefly), मावा (Aphids) आणि थ्रिप्स (Thrips) या कीटकांमुळे व्हायरस पसरतो.


2. व्हायरसवर थेट औषध आहे का?
❌ नाही
👉 व्हायरसवर थेट औषध उपलब्ध नाही, फक्त त्याचे वाहक कीटक नियंत्रण करावे लागते.


3. व्हायरस झालेल्या झाडावर उपचार करता येतो का?
❌ नाही
👉 संक्रमित झाड पूर्ण बरे होत नाही, त्यामुळे ते उपटून नष्ट करणेच योग्य.


4. व्हायरसची सुरुवातीची लक्षणे कोणती?
पाने वाकडी होणे
पिवळे/हिरवे डाग
वाढ खुंटणे


5. व्हायरस पसरू नये यासाठी काय करावे?
कीटक नियंत्रण करा
स्टिकी ट्रॅप वापरा
संक्रमित झाडे काढा


6. कोणते औषध वापरल्यास व्हायरस कमी होतो?
👉 व्हायरसवर नाही, पण कीटक नियंत्रणासाठी:
Imidacloprid
Thiamethoxam


7. व्हायरस कोणत्या हवामानात जास्त येतो?
👉 उष्ण आणि कोरड्या हवामानात जास्त प्रादुर्भाव होतो.


8. सेंद्रिय पद्धतीने नियंत्रण शक्य आहे का?
✔️ हो
👉 नीम तेल, NSKE, जैविक उपाय उपयोगी ठरतात.


9. एकदा व्हायरस आला तर किती नुकसान होते?
👉 50% ते 80% पर्यंत उत्पादन घट होऊ शकते.


10. व्हायरस टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती?
👉 सुरुवातीपासूनच कीटक नियंत्रण + नियमित निरीक्षण.

खत मार्गदर्शन जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

बोरॉन खत माहिती: कमतरतेची लक्षणे, फवारणीचे प्रमाण आणि उत्पादन वाढवण्याचे उपाय https://share.google/2gSeKdAbQXXhPYrq1

आमच्या फेसबुक पेजला भेट द्या

https://www.facebook.com/share/1FtwQ3juMA/

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2026 shetieakshastra.com | Powered by Superbs Personal Blog theme