Skip to content
Skip to content
Sheti Ek Shastra Agriculture Blog

shetieakshastra.com

शेतीविषयक वैज्ञानिक माहिती शेतकऱ्यांसाठी

Menu
  • Sheti Ek Shastra | शेतीविषयक वैज्ञानिक माहिती
  • खत मार्गदर्शन
  • पिकानुसार माहिती
  • कीड नियंत्रण
  • कॉन्टॅक्ट
  • जैविक बुरशीनाशके
  • शेती योजना
  • About
  • Disclaimer
  • Privacy Policy
Menu

टोमॅटो पिकातील टुटा किड नियंत्रण | Tuta Absoluta ओळख, लक्षणे व संपूर्ण उपाययोजना

Posted on March 2, 2026March 2, 2026 by mulekaran460@gmail.com

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण टोमॅटो पिकामध्ये मोठ्या प्रमाणात जी समस्या आहे त्या समस्येबद्दल बोलणार आहोत. ती म्हणजे टोमॅटो पिकातील तुटा किड नियंत्रण. tuta absoluta हे कीड टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे आज आपण टोमॅटो पिकातील तुटा किड नियंत्रण या किडीची ओळख टोमॅटो पिकातील सुरुवातीच्या काळातील लक्षणे आणि उपाययोजना आपण बघणार आहोत.

टूटा कीड म्हणजे काय ?

टूटा कीड ही एक पतंग वर्गातील किड आहे तिला आपण इंग्रजीमध्ये ( moth)प्रवर्गातील कीड सुद्धा म्हणतो. या किडीचा उगम हा दक्षिण अमेरिकेत झाला होता. परंतु ही कीड एवढ्या वेगाने पसरली की भारतासह जगातील अनेक देशांमध्ये हे कीड टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी बनले आहे. ही कीड टोमॅटो पिकातील खोडावर पानावर फुलावर आणि फळावर हल्ला करते यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. टोमॅटो पिकातील टूटा किड नियंत्रण हा आज टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा बनला आहे

टूटा या किडीचे जीवन चक्र

टूटा या किडीचे जीवन चक्र हे चार विभागात विभागलेले आहे ते आपण आता सविस्तर पाहू.

टोमॅटो पिकातील आळी

1) अंडी
मादी पतंग पानाच्या खालच्या बाजूस अंडी घालते ही मादी कमीत कमी 200 ते 300 अंडी घालते या अंडी तून चार ते सहा दिवसात अळी बाहेर निघते. त्यामुळे हे ओळखणे खूप गरजेचे आहे.

2)अळी
टूटा या किडीची सर्वात जास्त हानिकारक अवस्था कोणती असेल तर ती म्हणजे आळी ही अवस्था आहे. ही आळी हिरवट किंवा फिकट रंगाचे असते. पानाच्या आत मध्ये छोटी छोटी बोगदे तयार करते. आणि दहा ते पंधरा दिवसात हे आळी प्रौढ बनते. यानंतरची जी अवस्था असते ती म्हणजे कोश अवस्था.

3) कोश
तुटा या किडीची कोश अवस्था म्हणजे प्रौढ पतंग तयार होण्याची सक्रिय अवस्था होय. या अवस्थेत आपल्याला टोमॅटो मध्ये ही कीड निष्क्रिय अवस्थेत दिसते परंतु तिच्या शरीरामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात वेगवान हालचाली सुरू असतात. त्यानंतर ही आळी स्वतःभोवती रेश्मासारखा थर तयार करते त्यामुळेच याला कोश अवस्था असे म्हणतात. यानंतर ची अवस्था म्हणजे प्रौढ पतंग ही अवस्था असते.

4)प्रौढ पतंग
हा प्रौढ पतंग लहान व करड्या रंगाचा तपकिरी रंगाचा असतो. हा पतंग रात्री सक्रिय होऊन झाडावर मोठ्या प्रमाणात अंडी घालतो. मादी पतंग ची अंडी घालण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या किडीचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. किडीसाठी पोषक असलेल्या वातावरणात या किडीचे जीवन चक्र 25 ते 30 दिवसात होत पूर्ण होते. त्यामुळे थोड्या कालावधीतच ही कीड टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते आणि अनेकदा हे नुकसान 60% च्या वर जाते. आता आपण बघणार आहोत टूटा या किडीची लक्षणे.

टूटा किडीची लक्षणे
टूटा किडीची लक्षणे ओळखणे हे खूप सोपे आहे ही कीड पानावर बोगदे तयार करते. या किडीचा प्रसार असल्यास पान हे टवटवीत न राहता सुकल्यासारखे दिसते. फळावर डंक केलेली छोटी छोटी छिद्रे दिसतात. फळ आतून अनेकदा खराब होते. फळांचा दर्जा हा कमी होऊन उत्पादन खर्च वाढतो आणि उत्पन्न कमी येते.

टूटा या किडीमुळे होणारे नुकसान

टूटा या किडीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ही कीड टोमॅटोच्या प्रत्येक भागावर हल्ला करते ज्यामध्ये पान फुल फांद्या खोड या सर्वच भागावर ती हल्ला करत असल्यामुळे नुकसान होते. पाने व्यवस्थित न राहिल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे फुलगळ होते. या किडीचा डंक झाल्यास बाजारात या फळांना मागणी नसते किंवा बाजारात येणे योग्य ती राहत नाही. उत्पादन खर्च वाढून उत्पन्न कमी होते.

कीड वाढण्यास कारणे
ही कीड वाढण्यास सर्वात मोठे कारण वातावरणातील बदल ही कीड 20 ते 30 सेल्सिअस तापमानात जास्त वाढते. ही कीड वाढण्यास कोरडे हवामान अनुकूल राहते माझ्या अनुभवानुसार ही किडीचा प्रसार फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत राहतो. एकाच क्षेत्रामध्ये वारंवार टोमॅटो पीक घेतल्यास या किडीचा वाढ होते.

टोमॅटो पिकातील टूटा किड नियंत्रण कसे करावे
ही कीड येऊ नये म्हणून काही उपाययोजना पहिल्यांदा करणे आवश्यक आहे कारण ही कीड आल्यास उपाय करणे खूप कठीण बनते.
पहिल्यांदा निरोगी रोपे लावा जेणेकरून या किडीचा प्रसार होणार नाही. एकाच क्षेत्रात वारंवार टोमॅटो लावू नका. संक्रमित झाडे दिसल्यास लगेच काढून त्यांचा नायनाट करा.

जैविक उपाय.
सुरुवातीपासून जैविक उपाय केल्यास याचा फायदा नक्की होतो .यामध्ये आपण नीम तेल फवारणी
Beauveria bassiana वापर करू शकतो.

रासायनिक उपाय
मोठ्या प्रमाणात या किडीचा प्रसार झाल्यास रासायनिक औषधांशिवाय पर्याय नाही त्यामध्ये आपण स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेणे गरजेचे असते बहुदा आपण खालील औषधांचा वापर करू शकता
Emamectin Benzoate
Chlorantraniliprole
Spinosad
Indoxacarb
मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे औषध उपलब्ध आहेत त्यामुळे स्थानिक परिस्थिती आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा अनुभव यानुसार आपण टोमॅटो पिकातील टुटा किड नियंत्रण करू शकता. तसेच Tuta Absoluta ओळख, लक्षणे लवकर समजल्यास त्याचे नियंत्रण करणे सोपे जाते.

फवारणी करताना काय काळजी घ्यावी
फवारणी करत असताना नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी करावी जेणेकरून अधिक फायदा होतो. फवारणी करताना औषधे पानाच्या खालच्या बाजूने जाईल याची काळजी घ्यावी. औषधाचे लेबल वाचून शिफारशीप्रमाणेच औषधाचा वापर करावा जास्तीचे औषध वापरू नये त्यामुळे किडींची त्या औषधाप्रती सहनशीलता निर्माण होते नंतर नियंत्रण मिळवणे कठीण होते. एकच

माझा सल्ला
टूटा किड नियंत्रणासाठी रोज बागेत निरीक्षण करा.
नत्रयुक्त खताचा वापर कमी करावा.
संक्रमित झालेले फळ आणि झाड दोन्ही नष्ट करावे प्रसार थांबतो.
सुरुवातीच्या काळापासून ट्रॅप लावल्यास ही कीड नियंत्रणात राहते किंवा येतच नाही.

माझा अनुभव
टोमॅटो पिकातील टुटा किड नियंत्रण होण्यासाठी सुरुवातीपासून किडींची ओळख त्यांची लक्षणे माहीत असल्यास किड नियंत्रण ठेवणे शक्य होते.

निष्कर्ष
योग्य निरीक्षण, एकात्मिक व्यवस्थापन आणि वेळेवर टोमॅटो टुटा किड नियंत्रण केल्यास पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येते. आधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक उपायांचा वापर केल्यास टोमॅटो उत्पादन सुरक्षित ठेवणे शक्य आहे.

शेतकऱ्यांना पडणारे सामान्य प्रश्न
प्र. टुटा किड कोणत्या महिन्यात जास्त दिसते?
उ. उबदार व कोरड्या वातावरणात विशेषतः फेब्रुवारी ते सप्टेंबर दरम्यान प्रादुर्भाव वाढतो.
प्र. टुटा किड पूर्णपणे नष्ट करता येते का?
उ. पूर्ण नष्ट करणे कठीण असले तरी योग्य व्यवस्थापनाने नियंत्रणात ठेवता येते.
प्र. फेरोमोन ट्रॅप का आवश्यक आहे?
उ. नर पतंग आकर्षित करून किड वाढ कमी करण्यासाठी.


शेतकरी मित्रांनो हा लेख वाचल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद अशाच प्रकारे आपल्याला मिरची पिकाचे नियोजन पाहायचे असल्यास खालील लिंक ला क्लिक करा.मिरची लागवड नियोजन | 45 दिवसांचे संपूर्ण मार्गदर्शन https://share.google/3ZcwdTAq2sFfGoev6
तसेच आपल्याला पिकामधील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कमतरता कशी ओळखायची हे बघण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://share.google/H2TomGFNz3GzLSEjP
आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2026 shetieakshastra.com | Powered by Superbs Personal Blog theme