- नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण नेहमी शेती करत असताना एक गोष्ट अनुभवत असतो. ती म्हणजे पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता. परंतु ही अन्नद्रव्यांची कमतरता अजूक ओळखणे खूप गरजेचे असते. अन्यथा खर्च वाढतो पण त्याचा फायदा होत नाही. ही अन्नद्रव्यांची कमतरता कशी ओळखायची हीच माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

- प्रमुख अन्नद्रव्ये (Primary प्रमुख)
- अन्नद्रव्य म्हणजे ही अन्नद्रव्य पिकाला सर्वात जास्त लागतात यामध्ये नायट्रोजन, स्फुरद, पालाश, यांचा समावेश होतो
- सूक्ष्म अन्नद्रव्ये (Micronutrients)
- लोह (Fe)
- जस्त (Zn
- बोरॉन (B)
- मँगनीज (Mn)
- तांबे (Cu)
- मोलिब्डेनम (Mo)
- क्लोरीन (Cl)
- वरील अन्नद्रव्य हे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत परंतु या अन्नद्रव्यांची कमतरता पिकात निर्माण झाल्यास पिकाचा समतोल पूर्णपणे ढासळतो आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होते
- आता आपण बघणार आहोत अन्नद्रव्यांची कमतरता कशी ओळखायची सविस्तर
- पिकांची वाढ नीट होत नसेल, पाने पिवळी पडत असतील किंवा फुलधारणा कमी होत असेल तर बहुतेक वेळा त्यामागे अन्नद्रव्यांची कमतरता कारणीभूत असते. योग्य वेळी लक्षणे ओळखल्यास उत्पादनातील नुकसान टाळता येते.खाली प्रमुख, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची ओळख सोप्या भाषेत दिली आहे.
- ✅ पिकांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता कशी ओळखायची? मुख्य लक्षणे
- 🔹 नत्र (Nitrogen – N) कमतरता

- 2️⃣ दुय्यम अन्नद्रव्ये (Secondary Nutrients)
- 🔹 कॅल्शियम (Ca
- 🔹 मॅग्नेशियम( mg)
- गंधक( sulfar s)
- अन्नद्रव्य दुय्यम प्रकारची मानली जातात परंतु त्याची कमतरता पिकात निर्माण झाल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते
आता आपण बघणार आहोत नत्र म्हणजेच नायट्रोजनची कमतरता कशी ओळखायची शेतकरी मित्रांनो पिकामध्ये नत्र कमी असल्यास पिकांची जुनी पाने पिवळी पडतात पिकांची वाढ मंदावते तसेच पिकाची वाढ कमी होऊन पिक हे ठेंगणे राहते आपल्याला संपूर्ण पीक हे फिकट हिरव्या कलरची दिसतेमाझ्या अनुभवानुसार पिकाची खालची पाने पिवळी पडायला लागली की समजून घ्यायचे नत्राचे कमतरता आहे
स्फुरद (Phosphorus – P) कमतरता
कमतरतास्फुरद म्हणजेच फॉस्फरस याची कमतरता कशी ओळखायची पिकाची वाढ कमी होते पाने गडद हिरवी किंवा जांभळंट दिसतात मुळे कमकुवत होतात आणि फळधारणा ही उशिरा होते. माझ्या निरीक्षणा नुसार ही समस्या हिवाळ्यात जास्त निर्माण होते

पालाश (Potash – K) कमतरता

पिकामध्ये पालाशची कमतरता निर्माण झाल्यास पिकाच्या पानांच्या कडा या जळतात तसेच फळांचा आकार हा कमी होतो पाने वाकडेतिकडे दिसायला लागतात आणि पिकातील रोगप्रतिकारक्षमता कमी होते
- दुय्यम अन्नद्रव्यांची कमतरता
- कॅल्शियम कमतरता
- कॅल्शियम कमतरतेमुळे नवीन पाने वाकडेतिकडे निघतात शेंड्याची वाढ थांबते फळगळ किंवा फळ तडकणे अनेकदा अनुभवायला मिळते

- मॅग्नेशियम कमतरता
- पानांच्य शिरा हिरव्यागार दिसतात मात्र मधला भाग हा पिवळा दिसतो यामध्ये जुनी पाने आधी प्रभावित होतात पानांमध्ये व्ही आकाराचा पिवळेपणा दिसतो
सल्फर कमतरता
सल्फर कमतरतेमुळे नवीन पाने पिवळी पडतात संपूर्ण झाड हे फिकट दिसते वाढ मंदावते सल्फर कमतरतेमुळे झाडाची पाने ही नत्र कमतरते सारखेच पिवळी पडतात पण नत्र कमतरतेत खालील पाने पिवळी पडतात तर सल्फर कमतरतेत शेंड्याकडील पाने पिवळी पडतात
3️⃣ सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता
लोह(Fe)लोह कमतरतेत नवीन पाने पिवळी पडतात पण शिरा मात्र हिरव्या दिसतात
- जस्त (Zn)
जस्ट कमतरतेमुळे पानांचा आकार लहान राहतो आणि पानेही गुच्छ निघतात
- बोरॉन (B)
- बोरॉन कमतरतेमुळे फुलगळ आणि फळगळ होते तसेच फळांचा आकार विकृत होतो
मँगनीज (Mn)

मॅगनीजच्या कमतरतेमुळे पानावरती पिवळे ठिपके पडतात.
तांबे (Cu)तांब्याच्या कमतरतेमुळे झाडांचा शेंडा वाळतोआणि वाढ जागेवर थांबते

कमतरता ओळखण्याचा नियम
जुनी पाने पिवळी पडताना दिसली तर नत्र किंवा मॅग्नेशियम कमतरता असते नवीन पाने पिवळी लोह गंधक कॅल्शियम कडा जळालेस पालाशची कमतरतापिकांचा जांभळा रंग पालाशची कमतरता
माझ्या अनुभवानुसार शेतकऱ्यांसाठी मोलाचा सल्ला माती परीक्षण केल्याशिवाय खत वापर टाळासंतुलित खत व्यवस्थापन करासूक्ष्म अन्नद्रव्य फवारणी वेळेवर करा
निष्कर्ष
वरील माहितीच्या आधारावर पानांचा रंग, आकार आणि वाढ यावरून अन्नद्रव्यांची कमतरता सहज ओळखता येते. योग्य वेळी उपाय केल्यास उत्पादनात मोठी वाढ मिळू शकते.शेतकरी मित्रांनो आपल्याला हा लेख आवडल्यास अशाच माहितीसाठी आमचे पेज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन चे बटन दाबायला विसरू नका
शेतकरी मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आपल्याला इथून पुढे कोणत्या घटका विषयी माहिती हवी आहे ती आम्हाला कळवा आपल्या काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही त्यावर नक्कीच प्रतिक्रिया देऊ सध्या वेबसाईट अपडेट करणे सुरू आहे त्यामुळे आपल्याला काही अडचणी येत असतील तर क्षमा असावी हा लेख आपल्या शेतकरी ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद

उपर्युक्त सर्व माहिती उपयुक्त आहे
परंतु उत्पादनात वाढ आणि खर्चात बचत कशी करावी याचा विचार करून मार्गदर्शन करावे
ऊस पिक उत्पादनात
याच ऊस पिकाच्या चारी अवस्थांमध्ये
ही प्राथमिक ,दुय्यम आणि तृतीय खते
विना ठिबकसिंचनाची
कांडी लागवडीमध्ये
प्रती एकरी ही सर्व खते 3 ते 4 वेळेस कशी आणि किती प्रमाणात विभागून देता येतील
उत्पादन वाढी मध्ये 40 टन उत्पादन 80 टन कसे होईल
या बाबतीत व्यवस्थित मार्गदर्शन करावे
लोक प्रति एकरी 100 ते130टन उस उत्पादन घेतात
आपणास 100 टन उत्पादन टार्गेट नियोजन करता येईल काय
कोणत्या आळवण्या फवारण्या कधी आणि का कराव्यात
कीटक बुरशी आणि तण प्रादुर्भाव कसा दूर करायचा त्यावरील उपाय कोणते
3 ते 4 सेंद्रिय आणि रासायनिक खतांच्या मात्रा वेळ आणि कालावधी शेड्युल तुम्हांला बनवता येईल काय.
असे व्यवस्थित मार्गदर्शन करणे
नामदेव पांडुरंग पाटील
8888060544
तसदी बद्दल क्षमस्व